Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9789386401038
Publication Date : 2017
Binding : paperback
Price : 125.00
Pages : 116
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? 20 %
off
  Author : संपादन : राम जगताप
  Description :--    
चलनी नोटांना शह देणं आणि काळ्या पैशाला पायबंद घालणं, हे दोन्ही विषय सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे असले तरी त्याची किंमत आपण किती वेळ आणि किती काळ मोजायची? हा निर्णय चांगला आहे, पण पर्यायी व्यवस्था कार्यक्षमपणे राबवण्यासाठी ज्या यंत्रणात्मक बाबींची तंदुरुस्ती करणं आवश्यक आहे, त्याची खात्री करून जर हा निर्णय राबवला गेला असता, तर ते अधिक इष्ट झालं असतं. परिणामी आता लोकांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासारख्या सुधारणांबाबत सर्वसामान्यांच्या मनात असणारी आस्था, याला जी ओहोटी लागते आहे, तेही टाळता आलं असतं. कुठलंही साहस बेबुनियादी असेल किंवा राज्यकर्त्यांच्या अशा निर्णयाला प्रशासकीय सुधारणा, प्रशासकीय व्यवस्थांचं सक्षमीकरण आणि पर्यायी व्यवस्था राबवण्यासाठी कराव्या लागणार्‍या सगळ्या व्यवस्थात्मक सुधारणा यांची जोड नसेल तर चांगल्या हेतूनं केलेली एखादी सुधारणा कशी फसू शकते, त्याचंही हे उदाहरण आहे. त्यामुळे इथून पुढच्या सगळ्याच धोरणांच्या बाबतीत धोरणकर्त्यांना आणि आपल्याला हा शिकण्यासारखा धडा आहे. चमकदार, साहसी, अपूर्व अशा कल्पना निर्माण होणं, त्यांची धडाक्यानं आणि साहसानं अमलबजावणी करणं, हे आवश्यक असलं तरी त्याचे जे संभाव्य कल्पित आणि अकल्पित अनिष्ट परिणाम व्यवहारात संभवतात, त्यांचा मुकाबला करण्यासाठी ज्या सगळ्या सावधानता आपल्याला बाळगणं भाग आहे, त्याची पूर्वतयारी केल्याखेरीज असं पाऊल उचललं जाऊ नये. अभय टिळक जेष्ठ अर्थतज्ज्ञ
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services